इंजिनिअरिंग क्षेत्रातील दिग्गज लार्सन अँड टुब्रो (L&T) आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आक्रमक पावले टाकत आहे. त्यांच्या LTIMindtree आणि L&T Technology Services या कंपन्यांनी अलीकडेच मोठे करार मिळवले आहेत. यामध्ये LTTS ने अमेरिकेतील प्रमुख टेलिकॉम कंपनीकडून तब्बल 60 दशलक्ष डॉलर्सचा बहुवर्षीय करार जिंकला आहे. IT व डिजिटल सेवांमध्ये L&T ने जोरदार गुंतवणूक सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.