पुण्याच्या इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याने 10 हून अधिक नागरिकांना चावले, मात्र आवश्यक अँटी रेबीज सिरम गेल्या चार महिन्यांपासून रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे समोर आले. रुग्णांना बारामती किंवा खाजगी ठिकाणी पाठवावे लागले. नगरपरिषदेकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त सुरू असून, श्वानधारकांना सावध करणे सुरू आहे.