कोल्हापूरच्या नांदणी मठात ३५ वर्षांपासून असलेली हत्तीणी माधुरी हिला वनतारा प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आल्याने संतप्त झालेल्या जैन समाजाने बुलढाण्याच्या देऊळगाव राजा शहरात मूक मोर्चा काढला. मेटा संस्थेने चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप करत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हत्तीणीला गुजरातला हलवण्यात आलं. मात्र तिच्या भावनिक आणि धार्मिक संबधांचा आदर राखत ती पुन्हा नांदणी मठात परत आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवण्यात आलं आहे. जैन समाजाच्या भावना दुखावल्याने आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतो आहे.