मराठा आरक्षणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर कारस्थानाचा आरोप करत सरकारवर हल्लाबोल केला. “३ महिन्यात जे केलं नाही ते ३ दिवसांत होणार नाही. निर्णय घ्यायची हिंमत नसेल तर पायउतार व्हा,” असा इशारा त्यांनी दिला. मराठा-ओबीसी संघर्ष नको, कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.