Audiences like the movie ‘Tu Maja Kinara’ : येत्या शुक्रवारी मराठी सिनेप्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असणार आहे. कारण एकच दिवशी तीन-तीन मराठी चित्रपट सिनेमागृहात धडकणार आहे. यामध्ये कोणता चित्रपट बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. Well Done आई, तू माझा किनारा आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले हे तिन्ही चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, यामध्ये कोणता चित्रपट बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.सोशल मिडियावरील प्रेक्षकांचा एकूण प्रतिसाद पाहाता महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाला मागे टाकत क्रिस्टस स्टीफन यांच्या ‘तू माझा किनारा’ या चित्रपटाला अधिक पसंती मिळाल्याचे दिसून येत आहे. मात्र, प्रत्यक्ष चित्रपटगृहातच कोणता चित्रपट बाजी मारणार हे समजेल.
हिंदी चित्रपटासमोर मराठी चित्रपट टिकत नाहीत, त्यांना पहिलेच सिनेमागृह मिळत नाहीत, हे माहित असताना एकच दिवशी ३-३ चित्रपट रिलीज केले जात आहेत. ही मराठी कलाविश्वाकडून मोठी चूक झाल्याचे समोर आलं आहे. यामुळे कोणता ना कोणता चित्रपट मार खाणार हे नक्की. त्यामुळे कोणता चित्रपट चालणार आणि कोणता चित्रपट फ्लाॅप ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे हि वाचा : Mouni Roy Badmaash song : मौनी रॉयच्या बदमाश बद्दल ऐकलं का ? देते अस्सल बॉलिवूड थीमचा फील
यापूर्वीही झाली होती अशी चूक
यापूर्वी 12 सप्टेंबर 2025ला प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा ‘बिन लग्नाची गोष्ट’, ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांचा ‘आरपार’ आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा ‘दशावतार’ असे तीन चित्रपट रिलीज झाले होते. यातील ‘दशावतार’ चित्रपट आजही थिएटर गाजवत आहे. मात्र ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटांना हवे तसे यश मिळाले नाही. एकाच दिवशी तीन चित्रपट रिलीज केल्यामुळे हा परिणाम दिसून आला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता पुन्हा एकदा तीच चूक होताना दिसत आहे.
View this post on Instagram
Well Done आई
‘Well Done आई’ या चित्रपटात मराठ अभिनेत्री विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आई आणि मुलांच्या नात्याचा प्रवास दाखवणारा आहे. लेकरांवर जिवापाड प्रेम करणारी आई, कुटुंबासाठी अहोरात्र झटणारी आई यात दाखवली आहे. या चित्रपटात भावनिक तर आहेच त्यासोबत कॉमेडीचा तडकाही पाहायला मिळणार आहे.
तू माझा किनारा
‘तू माझा किनारा’ चित्रपटात भूषण प्रधान, केतकी नारायण आणि केया इंगळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून बाप-लेकीचे अबोल नाते उलघडताना दिसत आहे. हा एक फॅमिली चित्रपट आहे.
पुन्हा शिवाजीराजे भोसले
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ बोडके झळकणार आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा महेश मांजरेकरांचा चित्रपट आहे. या चित्रपटातून एक ऐतिहासिक प्रवास उलगडणार आहे.








