महाराष्ट्र राज्यात मंकी पॉक्स चा पहिला रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
संपूर्ण जगात थैमान घातलेला मंकी पॉक्स या आजाराने राज्यात आगमन केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाला जिल्ह्यातील हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तपासणी केल्यानंतर या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता रुग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. हा आजार संसर्गजन्य असून या रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया महापालिकेकडून करण्यात येत आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात आलॆ आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंकी पॉक्स झालेला हा रुग्ण चार वर्षांपासून सौदी अरेबिया येथे वास्तव्यास होता. तो तेथून मुलीच्या लग्नासाठी 2 ऑक्टोबर रोजी धुळ्यातील गरीब नवाज नगर भागात आला होता. परंतु त्याला अचानक वतःचेकाह त्रास जाणवू लागल्याने 3 ऑक्टोबर रोजी त्याला रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले.
धुळ्यात आढळलेला हा मंकी पॉक्सचा रुग्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. भारतात आतापर्यंत 35 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णाला डायबेटीज असल्याने बरा होण्यासाठी वेळ लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच हा आजार पसरु नये यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.