महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानावरून मोर्चासाठी रवाना झाले आहे. ते दादर ते चर्चगेट असा लोकलने प्रवास करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चर्चगेट स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. तर शरद पवार थोड्याच वेळात सिल्वर ओके या त्यांच्या निवासस्थानावरून या मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे देखील मातोश्री या निवासस्थानावरून मोर्चात सहभागी होण्यासाठी थोड्या वेळात रवाना होणार आहेत. त्यामुळे ठाकरी तोफा कोणावर डागल्या जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
‘मनसे-आविआ’चा मोर्चा कशासाठी
– निवडणूक आयोग पूर्ण प्रक्रिया पारदर्शक का करत नाही.
– नव्या मतदारांना संधी का नाही.
– आयोग मतदारांची यादी का देत नाही.
– एकाच घरात शेकडो मतदार कसे?.
– मतदारांची दुबार नाव का हटवली जात नाहीत.
– मतदार याद्यांमधील घोळ का मिटवला जात नाही.
– आयोग मतदारांची माहिती का देत नाही.
हे ही वाचा – ‘सत्याचा मोर्चा’आधीच ठाकरे बंधू, शरद पवारांना धक्का! काँग्रेसने फिरवली पाठ..
राज ठाकरेंनी प्रवाशांना दिली ऑटोग्राफ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई रेल्वे ने दादर ते चर्चगेट प्रवास करणार आहेत. यावेळी त्यांना भेटण्यासाठी प्रवशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. एका प्रवशाला राज ठाकरे यांनी रेल्वे तिकिटावर ऑटोग्राफ दिला आहे. हा ऑटोग्राफ फ्रेम करून ठेवणार असे प्रवशाने सांगितले.
ढोल-ताशे वाजवत मनसे कार्यकर्ते चर्चगेटच्या दिशेने निघाले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी घोटी टोलनाका वर पोहचले, ग्रामीण आणि शहरातील पदाधिकारी याठिकाणी एकत्रित जमून मुंबईच्या मोर्चासाठी रवाना होत आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांसोबतच माकपचे पदाधिकारी देखील घोटीत जमले असून मनसेचा भगवा ध्वज आणि माकपचे लाल झेंडे एकत्रच या मोर्च्या च्या निमित्ताने एकत्रित दिसत आहेत. सत्याचा मोर्चामध्ये सामील होण्यासाठी कांदिवली चारकोप मधून मोठ्या संख्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते ढोल-ताशे वाजवत चर्चगेटच्या दिशेने निघाले आहे.








