महू धरणग्रस्तांनी आज धरणावर येऊन जाहीर निषेध व्यक्त केला. “धरणग्रस्तांचे प्रश्न शंभर टक्के सुटल्याशिवाय धरणातील पाण्याचा एक थेंबही सोडू देणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. वसंतराव मानकुमरे यांच्या जलसमाधी आंदोलनात एकही प्रकल्पग्रस्त सहभागी होणार नाही, असे सांगत धरणग्रस्तांनी त्यांना घरचा आहेर दिला. येत्या ३ तारखेला होणाऱ्या आंदोलनाला त्यांनी उघड विरोध नोंदवला आहे.