मुंबई – अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना उघड झाली आहे. हा अपघात या महामार्गावरील चारोटी येथील एशियन पेट्रोल पंपाजवळ घडला असून या दृघटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने महिलेला धडक दिली. हि धडक एवढी जबरदस्त होती कि, वाहनाने महिलेला 100 मीटर पर्यंत फरफटत नेले आहे. या दुर्घटनेत मृत महिलेचा देह पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.