शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घरफोडी करणारा संशयित विशाल अजित आटोळे याला ताब्यात घेत 4 लाख 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात सोन्याचे दागिने व 1.94 लाख रुपये रोख रक्कमचा समावेश आहे. CCTV फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्यात आला. सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.