राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी झपाट्याने वाढताना दिसत आहे. शुक्रवारी पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील रस्ता ओलांडताना हातात चाकू अन चेहऱ्यावर मास्क लावून फिरणारा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेणे सुरु आहे.