अहिल्यानगरमधील नाझसाब चौकात संभाव्य विरोधकाला बंदुकीचा धाक दाखवत धमकवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकांचे वेध लागल्याने शहरात विरोधकांना धमकवण्याचे प्रकार सुरु असून कोयत्याने वार करण्यात आले. यासंदर्भात माजी नगसेवकासह त्याच्या टोळीतील 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे