मनोज वाजपेयी यांनी ‘फॅमिली मॅन 3’साठी भरपूर मानधन मिळालं, असं जरी म्हटलं जात असलं तरी एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं – “हे OTT वाले पैसेच देत नाहीत!” ‘अनफिल्टर्ड विद समदिश’ पॉडकास्टमध्ये ते म्हणाले की, “आम्ही त्यांच्यासाठी स्वस्तातले मजूर आहोत. गोऱ्यांना भरभरून पैसे देतात पण आम्हाला नाही.” त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शाहरुख-सलमानसारखं मानधन नाही मिळत. ‘फॅमिली मॅन’सारख्या यशस्वी मालिकेनंतरही हा अन्याय का? – असा सवालही उपस्थित होतोय. प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या वाजपेयींचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय.