लोकप्रिय आसामी गायक आणि अभिनेता झुबीन गर्ग याचे कुबा ड्राइव्हिंग करताना निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना तो समुद्रात पडल्याचं वृत्त समोर आले आहे.
झुबीन हा 19 सप्टेंबर रोजी नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला पोहोचला होता. कूबा डायव्हिंग दरम्यान तो समुद्रात पडला आणि बेशुद्ध झाला. झुबीनला ताबडतोब गोताखोरांनी वाचवून रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूच्या बातमीनं त्याच्या चाहत्यांना आणि सहकारी संगीतकारांना धक्का बसला आहे.
आसामी अभिनेता जुबिन गर्ग हे केवळ गायकच नाही तर अभिनेते आणि लेखक देखील होते. त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1972 रोजी मेघालयमध्ये झाला होता. जुबिन गर्ग यांचे पूर्ण नाव जुबिन बोरठाकूर गर्ग असे होते. ते 52 वर्षाचे होते. आसामी भाषेसोबतच त्यांनी बंगाली, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, मराठी, मिसिंग, नेपाळी, ओडिया, संस्कृत यासारख्या 60 भाषांमध्ये गाणी गायली होती.
बॉलिवूडमध्येही गायले अनेक गाणी
बॉलिवूड मध्ये त्यांनी बरीच गाणी गायलीत. कंगना रणौत, इमरान हाश्मी आणि शायनी आहुजा यांच्या गँगस्टर चित्रपटासाठी त्यांनी ‘या अली’ हे गाणे गायले होते. जे कि सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यांना सुमारे 12 प्रकारची वाद्ये वाजवता येत होती. 1995 मध्ये ते मुंबईला आले आणि आपला पहिला इंडीपॉप एकल अल्बम चांदनी रात लाँच केला. त्यांनी दिल से, डोली सजा के रखना, फ़िज़ा, कांटे यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली होती.