आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदाना यांच्या बहुप्रतीक्षित थमा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 21 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वीच या चित्रपटाचे परीक्षण (Review) समोर आले आहे.
थमा हा चित्रपट परफेक्ट दिवाळी एंटरटेनर असल्याचे मत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी व्यक्त केले आहे. हा चित्रपट ‘मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स’ मधला एक चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मॅडॉक फिल्म्सचं खूप कौतुक करण्यात आलं आहे.
थमा हा चित्रपट विनोद, सुपरनॅच्युरल आणि रोमान्स यांचा परफेक्ट समतोल साधला असून या चित्रपटाची कथा जशी जशी पुढे सरकते, तसे खुर्चीला खिळवून ठेवणारे ट्विस्ट पहायला मिळत असल्याचे तरण आदर्श ने सांगितले. या चित्रपटाची कथा भारतीय लोककथांवर आधारित असून या ‘थमा’ चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार याने केले आहे. तो प्रेक्षकांना निराश करणार नाही, असेही तरण आदर्शने म्हंटलंय. या चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी असून चित्रपटात प्रचंड सस्पेन्स असल्याचे दिसूनयेते. हा सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आणि याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहण्यासारखी आहे.
चित्रपटाची कथा रंजक असून कॉमिक आणि पंचलाईन सुद्धा प्रेक्षकांना हसवायला भाग पाडते. परंतु मध्यांतरानंतर चित्रपटाचा वेग थोडा मंदावतात दिसतो, परंतु त्याच्या कथेवर कोणताच परिणाम दिसून येत नाही. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर ‘पॉयजन बेबी’, ‘तुम मेरे ना हुए’ आणि ‘दिलबर की आंखो का’ ही गाणी रिलीज झाल्यापासून चर्चेत आहेत.
याशिवाय हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. या चित्रपटाच्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे आणखी भीतीदायक आणि तितकाच रंजक हा चित्रपट बनतो.