मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अप्रतिम कॉमिक टाइमिंग साठी आणि बॉलीवूडमधील अविस्मरणीय भूमिकांसाठी ओळखले जाणारे जेष्ठ अभिनेते तथा दिग्दर्शक यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या 205 चित्रपटांमधून मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते सतीश शहा यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी आज दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. सतीश शहा हे बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या संबंधित आजाराने त्रस्त होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिनेता सतीश शहा यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यांच्या विनोदाला प्रेक्षकांकडून खळखळून प्रतिसाद मिळायचा. त्यांचा जन्म मुंबई येथे 25 जून 1951 रोजी गुजराती कुटुंबांमध्ये झाला होता. त्यांनी त्यांची पदवी सेंट झेवियर्स कॉलेजमधून प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये अभिनयाचे धडे गिरवले.
त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून अभिनय शिकल्यानंतर बऱ्याच थिएटरमध्ये देखील काम केले. त्यांनी थिएटर मध्ये सतीश कौशिक, नसिरुद्दीन शहा यांसारखे प्रमुख कलाकारांसोबत देखील काम केले. त्यानंतर 1978 साली अरविंद देसाई यांच्या अजिब दास्तान या चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर साराभाई विरुद्ध साराभाई, जाने भी दो यारो, ममैं हू ना यासारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली.
अभिनेता सतीश शहा यांच्या पश्चात त्यांची बायको आहे. त्यांनी 1982 मध्ये फॅशन डिझायनर मधु शहा यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांना मुल बाळ नव्हते. आयुष्यभर या जोडीने एकमेकांना भक्कमपणे साथ दिली. सतीश शहा यांनी नेहमी आपल्या कामालाच प्राधान्य दिले. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 5.5 कोटी असल्याचं सांगितल्या जाते.
अभिनेता सतीश शहा यांची खास कहानी म्हणजे त्यांनी फक्त मृतदेहाची भूमिका साकारून देखील संपूर्ण चित्रपटांतून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. महाभारतातील वस्त्रहरणाचा सीन असो किंवा अचानक कॉफीन मधून बाहेर पडून कार चालवण्याचा सिन असो प्रत्येक महत्त्वाच्या विनोदी दृश्यात ते मृतदेह म्हणून उपस्थित असायचे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून प्रत्येक प्रेक्षकांना हसू आवरणाचे व्हायचे. त्यांनी विनोदी भूमिका करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.









