मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेता पंकज धीर यांचं निधन झालं आहे. त्यांनी बीआर चोप्रा यांच्या महाभारतात कर्णाची भूमिका साकारली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज कर्करोगाशी झुंजत होते आणि त्यांनी ही लढाई जिंकली होती. मात्र गेल्या काही महिन्यांत त्यांचा कर्करोग परत झाला. अभिनेत्याची प्रकृती गंभीर होती. या आजारामुळं त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रियाही झाली होती, परंतु पंकज यांना वाचवता आलं नाही. पंकज यांच्या निधनाच्या बातमीनं टीव्ही इंडस्ट्रीवर दुःखाची लाट पसरली आहे. चाहतेही दुःखी आहेत. चाहते आणि सेलिब्रिटी पंकज यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
CINTAA नं जारी केलं निवेदन :
CINTAA (सिने आणि टीव्ही कलाकार संघटना) ने धीर यांच्या निधनाची पुष्टी करणारं अधिकृत निवेदन जारी केले. त्यात म्हटलं आहे की, “आमच्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि CINTAA चे माजी मानद सरचिटणीस श्री. पंकज धीर यांचं 15 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाल्याचं आम्ही तुम्हाला कळवत आहोत. आज दुपारी 4:30 वाजता मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम) येथील पवन हंस यांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.”
सुप्रसिद्ध धारावाहिक ‘महाभारत’ में दानवीर कर्ण का जीवंत और अविस्मरणीय किरदार निभाने वाले ख्यात अभिनेता पंकज धीर जी के निधन का समाचार दुःखद है।
बाबा महाकाल पुण्यात्मा को अपने परमधाम में स्थान दें तथा शोकाकुल परिजनों को इस कठिन घड़ी में संबल प्रदान करें।
ॐ शांति….विनम्र… pic.twitter.com/9j2XwGPbyz
— Dr.Krishnapal Singh Yadav (@DrKPSinghYadav) October 15, 2025
महाभारतात साकारली कर्णाची भूमिका :
पंकज यांनी टीव्ही आणि चित्रपट उद्योगात अनेक प्रकल्पांमध्ये काम केलं होतं. मात्र बीआर चोप्रांच्या 1988 च्या महाभारत चित्रपटामुळं त्यांना प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये त्यांनी कर्णाची भूमिका साकारली. त्यांनी ज्या गांभीर्यानं ही भूमिका साकारली त्याचं उदाहरण आजही दिलं जातं. एका मुलाखतीत पंकज यांनी खुलासा केला की त्यांनी सुरुवातीला अर्जुनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं आणि करारावर स्वाक्षरी केली होती. मात्र त्यांचं ऑडिशन चांगलं झालं असूनही, ही भूमिका फिरोज खानकडे गेली.
हे ही वाचा : बॉबी देओल दिसणार नव्या लुकमध्ये; ‘प्रोफेसर व्हाइट नॉईज’ म्हणून करणार भूमिका
करार टाकला होता फाडून :
याचं कारण स्पष्ट करताना पंकज म्हणाले की निर्मात्यांना बृहन्नालाच्या भूमिकेसाठी त्यांनी मिशा काढाव्यात अशी इच्छा होती, परंतु त्यांनी हा निर्णय घेण्यास नकार दिला. त्यांच्या हट्टीपणामुळं बीआर चोप्रा संतापले. त्यांनी रागानं त्या अभिनेत्याला स्टुडिओतून बाहेर काढले आणि त्याचा करार फाडून टाकला. पंकज सहा महिने कामावर नव्हता. नंतर बी.आर. चोप्रा यांनी त्याला कर्णाच्या भूमिकेत घेतलं.