Sonu Nigam tribute Satish Shah : अभिनेता सतीश शहा यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना मिळालेला आनंद, त्यांची आपलीशी वाटलेली भूमिका अजूनही चाहत्यांच्या मनात घर करत आहे. अभिनेता सतीश शहा यांच्या निधनानंतर त्यांच्या आप्तेष्टांची आणि प्रियजनांची 27 ऑक्टोबरला मुंबई येथे प्रेयर मिटचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी त्यांच्या लोकप्रिय मालिकेतील सहकलाकार उपस्थित राहिले. त्यांनी यावेळी अभिनेता सतीश शहा यांचे आवडते गाणे छेडत डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळी करून देत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली. या क्षणी संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते.
View this post on Instagram
तेरे मेरे सपने अब एक रंग है (Sonu Nigam tribute Satish Shah)
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ट्रिब्यूट मध्ये सोनू निगम यांनी सतीश शहा याना श्रद्धांजली अर्पण करत एक मनाला स्पर्श करणारं गाणं गात भावनिक वातावरण तयार केले. सोनू निगम यांनी तेरे मेरे सपने अब एक रंग है हे गाणे गात सतीश शहा यांची पत्नी मधू निगम यांनाही ट्रिब्यूट मधेय सामील केले. सतीश शहा सोबत काम केलेल्या प्रत्येक सहकलाकाराला या प्रेयर ट्रिब्यूट मध्ये त्यांच्या सोबतच्या अविस्मरणीय क्षणांची आठवण नक्कीच झाली असेल.
View this post on Instagram
जेव्हाही एकत्र असायचो तेव्हा आम्ही गाणे गात असायचो
यावेळी सोनू निगम यांनी त्यांच्या बद्दल सांगितले कि, सतीश शहा यांनी आयुष्यभर लोकांना हसवून प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रेमाचा कोपरा तयार केला. परंतु आता आज आम्ही त्यांच्या आठवणीत रडत आहोत.” तर रुपाली गांगुली म्हणाल्या कि, आम्ही सर्वानी मिळून एक गाणे गात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही प्रत्येक वेळेस जेव्हाही एकत्र असायचो तेव्हा आम्ही गाणे गात असायचो. म्हणून आम्ही त्यांच्या आठवणीत गाणे गात आहोत.”












