Sushant Singh Rajput sister revelation : बॉलीवूड मध्ये एका फेमस अभिनेत्याच्या मृत्यूचा 5 वर्षानंतर करण्यात आलेल्या खुलासामुळे खळबळ उडाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूबाबत त्यांची बहीण श्वेता सिंह कीर्तीने मोठा गौपा स्पॉट केला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये श्वेता सिंह कीर्तीने भावाच्या मृत्यू बाबत एक धक्कादायक दावा केला. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केलेली नाही असं तिने या मुलाखतीत म्हटलं आहे. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सीबीआय, इडी, एनसीबीने या प्रकरणाचा तपास केला होता. यानंतर काही महिन्यांपूर्वी सुशांत सिंग राजपूत केस मध्ये अडकलेल्या रिया चक्रावतीला क्लीन चीट देण्यात आली होती. परंतु आता सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने केलेल्या दाव्यामुळे आणखीन एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्ट मध्ये श्वेता सिंह कीर्तीने सुशांत सिंह मर्डर केसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ती म्हणते की, ‘आत्महत्या कशी होऊ शकते जर तुम्हाला गळफास घ्यायचा असेल तर तुम्ही स्टूल चा वापर कराल. परंतु तिथे स्टूलच सापडला नाही. सुशांतच्या गळ्यावर सापडलेले निशाण कपड्यांनी लागणारे नव्हते. ते दुपट्ट्याचे देखील नव्हते. तो एक चेन टाईम चा हलका निशाणा होता.’
दोन लोक आले होते त्यांनी त्याचा मर्डर केला
सुशांत सिंह च्या मृत्यूनंतर दोन मानसोपचार तज्ज्ञांनी माझ्याशी संवाद साधला. त्यांनी मला सर्व काही सांगितलं. या मानसोपचार तज्ञांपैकी एक अमेरिकेची तर दुसरा मुंबईचा होता. या मानसोपचारतज्ञाला माहीतच नव्हतं की तो माझा भाऊ आहे. ती म्हणाली, की त्याचा मर्डर झाला आहे. त्या मानसोपचार तज्ञांनी आम्हाला सांगितलं की दोन लोक आले होते त्यांनी त्याचा मर्डर केला.
रिया चक्रवतीने एक पोस्ट शेअर केली होती (Sushant Singh Rajput sister revelation)
श्वेता पुढे म्हणाली की, माझ्या भावाचे करिअर व्यवस्थितरित्या बनत होते. बॉलीवूड इंडस्ट्री बाबत मला माहिती नव्हते. एक कॉलही आला त्यात सांगण्यात आलं होतं की, तो जगणार नाही. कारण त्याच्यावर काळी जादू करण्यात आली आहे. रिया चक्रवतीने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती यामध्ये सुशांत सिंह राजपूत चा फोटो होता. आणि त्यावर कॅप्शन दिलेले होते की तू खूप उंच उडत आहेस तुझे पंख छाटावे लागतील. आणि यावर सुशांत सिंह राजपूत ने लाईक केलं होतं. मला हे सर्व वेगळे वाटत वाटलं












