Thama vs Ek Deewane Ki Deewaniyat : रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना यांचा थामा आणि सनम तेरी कसम फ्रेम अभिनेता हर्षवर्धन राणेंचा एक दिवाने की दिवानियत हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. दिवाळीनिमित्त 21 ऑक्टोबरला थिएटर मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी दिवाळीनिमित्त दोन्ही चित्रपटांचा आस्वाद घेतला. या दोन्ही चित्रपट एकमेकांवर वरचढ ठरले. चला पाहूया कोणत्या चित्रपटाने केली बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई.
बॉलीवूड मध्ये बरेच वर्षे संघर्ष केल्यानंतर अभिनेता हर्षवर्धन राणेला यश मिळालंय. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला एक दिवाने की दिवानियत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळवला. या चित्रपटाने 49.35 कोटी रुपयांची कमाई केली. तर आयुष्मान खुराणाच्या थामा या चित्रपटाने एकूण 101.3 कोटी रुपयांची कमाई केली.
हे हि वाचा : महाकालीचा रुद्रावतार दर्शवणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर पाहिले का ? ही अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका
सॅकनील्कचा रिपोर्टनुसार मंगळवारी थामा या चित्रपटाने 5.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 101.3 कोटी एवढे झाले. तर याच रिपोर्टनुसार मंगळवारी एक दिवाने की दिवानियतने 4.35 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे या चित्रपटाचे एकूण कलेक्शन हे 49.35 कोटी रुपये एवढे आले. या चित्रपटाचा बजेट हा 30 करोड होता.
View this post on Instagram
आयुष्मान खुरानाच्या थामा चित्रपटाने वरून धवन आणि कृती सेनन यांच्या भेडिया या चित्रपटाला मागे टाकले. भेडिया चित्रपटाने भारतात 68.99 कोटी रुपये आणि जगभरात 94.91 कोटी रुपये कमावले होते. परंतु आता हा रेकॉर्ड मोडत थामा चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटाचा बजेट हा 145 करोड होता. आयुष्मान खुराना लवकरच ड्रीम गर्ल टू चा रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
एक दिवाने की दीवानी यात या चित्रपटांमध्ये अभिनेता हर्षवर्धन राणे सोबत सोनम बाजवा अभिनेत्री झळकली. तर थामा चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना, आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दिकी, सप्तमी गौडा, डायना पेंटी, वरून धवन, संजय दत्त , अपारशक्ती खुराना हे कलाकार झळकलेत.












