मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईला निघाले मात्र त्यांना 40 अटींचं पत्र देण्यात आलंय. त्यात 5000 आंदोलकांची मर्यादा, केवळ एक दिवस आंदोलनाची परवानगी, कोणतेही घातक शस्त्र बाळगू नये, आणि कोणाकडूनही जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच अत्यावश्यक वाहने विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यावी अशा 40 अटींचं पत्र जरांगे पाटील यांना देण्यात आले आहे.