मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षण संबधित मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणासाठी मुंबई प्रशासनाने त्यांना 1 दिवसाची परवानगी दिली होती. परंतु, प्रशासनाने त्यांना अजून एका दिवसाची परवानगी वाढून दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून देणार नसल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नसल्याचे सांगितले आहे.