मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या सतीश देशमुख यांचा पुण्यात हृदयविकाराने मृत्यू झाला. सतीश देशमुख बीडच्या केज तालुक्यातील रहिवासी आहेत. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे थांबलेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचा मृत्यू झाला. सतीश देशमुख यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.