मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातील फलटणमधील मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाने तब्बल ५० हजार लाडू व चिवडा तयार केला आहे. हे साहित्य कार्यकर्ते आज मुंबईला घेऊन जाणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्या जेवण-नाश्त्याची सोय म्हणून ही पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, मुस्लिम बांधवांनीही चिवडा-लाडू बनवण्यासाठी मोफत मदत केली आहे.