पुण्यात एका तरुणाने मॅट्रिमोनी वेबसाइटवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. त्यानंतर तिचे फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपये उकळले. लग्नाची मागणी करताच आरोपीने आत्महत्येची धमकीही दिली. पीडितेच्या तक्रारीवरून खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.