कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर लवकरच मीटरने रिक्षा सुरू होणार असल्याची माहिती आज रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर शेअरिंग रिक्षा सुरू होत्या. मीटर प्रमाणे रिक्षा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात होती. आज RTO चे अधिकारी आणि रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेशन परिसरात पाहणी केली.