स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील मिनी काश्मीर तापोळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली. शिवसागर जलाशयातील स्पीडबोट, पॅडल बोट, स्कूटर बोट यांसह विविध बोटींगचा थरार अनुभवत पर्यटकांनी निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला. गर्दीमुळे परिसरातील हॉटेल्स व कृषी पर्यटन केंद्रे फुल्ल बुक झाली.