संग्रामपूर-वरवट बकाल मार्गावर मिनी ट्रक आणि विना-नंबर ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या धडकेत मिनी ट्रक उलटल्याने त्यातील मजुर जागीच ठार झाला. ट्रॅक्टरचालक ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. धडक झाल्यानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.