रिसोड तालुक्यातील वाडी रायताळ येथे नाल्याच्या पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना आज, 16 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. मृतकाचे नाव पिराजी किसन गवळी असून, वय 69 वर्षे होते. ते काल, 15 ऑगस्ट रोजी, शेतात गेले होते. मृतदेह नाल्यात आढळला असून, रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. पिराजी किसन गवळी वाडी रायताळ येथील खालतलची नदी मध्ये वाहून गेले आहेत.