मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या पाठीशी लाखो मराठा समाज उभा आहे. आंदोलनस्थळी अन्न-पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांच्या जनसंपर्क कार्यालयातून मसाला पुरी, चिवडा, नाश्ता व पाण्याच्या बाटल्या भरलेली गाडी मुंबईला रवाना करण्यात आली.