नागपुरात अवैध चिकन-मटन मार्केटला मनपा अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप करत मनसेने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. मनसे नेत्यांनी मनपा अधिकाऱ्यांना थेट कोंबड्या भेट दिल्या आणि एक आठवड्यात मार्केट बंद न केल्यास महापालिकेतच चिकन विक्री करू, असा इशारा दिला. वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या भावनांशी खेळ चालू असल्याचा आरोपही करण्यात आला.