अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या मंदिरात आजपासून भाद्रपद यात्रा उत्सव सुरू झालाय. या निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. भाविकांना स्वतःच्या हाताने गणपतीला जल अभिषेक करता येतो. वर्षभरातील भाद्रपद व माघ महिन्यात श्री मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते. यावेळी भाविकांना श्री च्या मुर्तीला जला अभिषेक घालता येतो हा जलाभिषेक घालण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.