महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) राज्यसेवा 2024 मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससीची परीक्षा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची लढाई असून यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC राज्यसेवा परीक्षा होतात त्या परीक्षेच्या माध्यमातून राज्य प्रशासनाला अधिकारी मिळतात. नुकताच MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून यावर्षीच्या निकालात एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे तो म्हणजे आरक्षण व्यवस्थेमुळे बदलत गेलेला कटऑफचे गुण…
OBC कटऑफ वाढणार, EWS साठी नवा अध्याय
MPSC च्या निकालात OBC तसेच खुल्या गटाचा कटऑफ लक्षणीय वाढलेला दिसून येत आहे. अर्थात, खुल्या गटाचा कटऑफ साधारण 507 तर OBC चा 485 इतका गेला असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा मोठा फरक मानला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षण निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील स्पर्धा प्रचंड तीव्र झाली असून, खुल्या गटाइतकीच टक्कर आता OBC प्रवर्गात उमेदवारांमध्ये होत आहे. यामुळे पात्र ठरण्यासाठी अधिक गुणांची आवश्यकता निर्माण झाली आहे. खुल्या गटांसाठी 507 तर OBC गटांसाठी 485 गुणांचा कटऑफ असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली.
यामुळे EWS (Economically Weaker Sections) प्रवर्गासाठी हा निकाल म्हणजे सुखाचे दिवस ठरतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे कारण मराठा समाज आता EWS प्रवर्गातून बाहेर पडला आहे. मराठा समाजाला न्यायालयीन निर्णयानुसार स्वतंत्र आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे ते EWS (Economically Weaker Section) प्रवर्गातून बाहेर गेले आहेत. यामुळे या प्रवर्गातील रिक्त जागा इतर उमेदवारांना उपलब्ध झाल्या असल्यामुळे परिणामी, EWS गटातील उमेदवारांसाठी हा निकाल अत्यंत सकारात्मक ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाचा मोठा सहभाग EWS मध्ये असल्याने इतर उमेदवारांच्या संधी कमी होत होत्या. मात्र आता परिस्थिती उलटली आहे.
यामुळे मात्र OBC प्रवर्गात असंतोषाची लाट पसरली आहे. कारण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाल्यामुळे एकीकडे OBC मध्ये जास्त चढाओढ दिसून येत आहे. तर दुसरीकडे कटऑफही प्रचंड उंचावला आहे. यामुळे मध्यम स्तरावरील उमेदवारांची मोठी गळती झाली आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हा मुद्दा गंभीर ठरत असून, भविष्यात यावरून राजकीय पातळीवर नवे वाद उभे राहण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी वाढलेला कटऑफ हा मोठा आव्हानात्मक घटक आहे. त्यामुळे आजचा निकाल फक्त निवडक उमेदवारांसाठी नाही, तर आरक्षणाच्या बदलत्या रचनेवर प्रकाश टाकणारा महत्वाचा