जळगावच्या जळके गावात बारा गावांचा वीज पुरवठा खंडित केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी
मीटर तपासणीसाठी घरी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थ तरुणाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सुद्धा यावेळी घडली. या घटने प्रकरणी संबंधित ग्रामस्थ तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गावात वाढीव बिल येत असल्याने महावितरणचे कर्मचारी मीटर तपासणीसाठी गेले होते. ग्रामस्थ तरुणाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्याने दिली आहे.