मुक्ताईनगर आणि कुऱ्हा भागात सततच्या विजेच्या समस्येवरून मुक्ताईनगर शिवसेनेचे तालुकाप्रमुख नवनीत पाटील यांनी वीज वितरणच्या अभियंताला कार्यालयातच समज दिल्याचा प्रकार उघड झालाय. यावेळी लाईट दहा – पंधरा मिनिटांनी जाते आणि दोन दोन घंटे येत नाही तुम्ही काय लक्ष देता, आढावा घ्या नाहीतर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तरे देऊ असा समज त्यांनी दिला.