मुंबईच्या वनिता सांगडे यांना कबुतराच्या पिसामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांच्या फुप्फुसात कबुतराचं पीस अडकल्याचं स्पष्ट झालं. गेल्या 10 वर्षांपासून त्या ऑक्सिजन मशीनवर जगत आहेत. लंग ट्रान्सप्लांटचा सल्ला देण्यात आला असला, तरी खर्च परवडणारा नाही. वनिता यांचं कुटुंब कबुतरखाने बंद करण्याची मागणी करत असून, नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.