मुंबई : मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुम्ही जर कूपर रुग्णालयात उपचारासाठी जाणार असाल तर सावधान रहा कारण हॉस्पिटल मधील रुग्णांना उंदराने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. ते ही एका रुग्णाला नाही तर तब्बल 6 रुग्णांना चावा घेतला आहे. या घटनेने कूपर रुग्णालयावर ताशेरे ओढण्यात आले आहे.
मुंबई येथील कूपर रुग्णालयात गेल्या काही महिन्यापासून उंदरांचा हैदोस माजला आहे. दोन महिन्यात उंदरांनी 6 जणांना चव घेतला असुन रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अंद्राडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याठिकाणी सहा नाही तर 2 घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण पोलिसांकडील नोंदणीनुसार वेगळेच निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुग्णालय या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे.
मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. रुग्णालयात साफसफाई नसल्यामुळे हा प्रकार घडत असून नातेवाईक संताप व्यक्त करत आहे. एवढेच नाही तर या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याची माहिती देखील उघड झाली आहे. या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मत नातेवाईकांनी व्यक्त केलाय.