Mumbai Bomb Threat 2026: देशात गेल्या काही दिवसांपासून एक ना एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे…काही दिवसांपूर्वी सीजेपीच्या आंदोलनामुळे देशभरात वातावरण तापलं होतं…आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती….यानंतर बिश्नोई गँगने अभिनेता टायगर श्राफवर गोळीबार केला…टायगर थोडक्यात बचावला…ही घटना ताजी असतानाच आताच आता मुंबईला पुन्हा वेठीस धरण्यात आलं आहे…मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत कार्यालयाला बॉम्बनं उडवण्याचा धमकीचा मेल आलाय…
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सुप्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्यासह मुंबईतील तीन ते चार नामांकित शाळांना बॉम्बनं उडवण्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे…या धमकीनंतर शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत…पण अचानक मुंबईत या घटना का घडत आहे? मुंबईला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कोण करत आहे? सेलिब्रिटींना टार्गेट का केलं जातंय? शिख धर्मातून येणारे दिलजीत दोसांझ यांना टार्गेट का केलं जातंय? पाहूयात या प्रश्नांची उत्तर सविस्तर…
मुंबईच्या महापौर कार्यालयाला आणि शाळांना धमकीचा ई-मेल (Mumbai Bomb Threat 2026)
बिश्नोई गँगच्या टोळीने टायगर श्राफवर भर रस्त्यावर हल्ला केला…बिश्नोई गँगने स्पष्ट केलं की जो सलमान खानसोबत काम करेल आम्ही त्याला सोडणार नाही…पण या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झालाय की टायगर श्रॉफने सलमान खानसोबत कोणत्या चित्रपटात काम केलंय…टायगरने आतापर्यंत सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केलेली दिसत नाही…मग टायगरवर हल्ला करण्यामागचा उद्देश काय होता? असा प्रश्न निर्माण झालाय… ही घटना ताजी असताना पुन्हा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला पुन्हा एकदा मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या धमकीने हादरवून सोडले आहे.. सकाळच्या सुमारास आलेल्या या खळबळजनक ई-मेलमुळे संपूर्ण मुंबई पोलीस दल आणि राज्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून शहरात तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे… स्वतःला ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रतिनिधी सांगणाऱ्या एका अज्ञात आरोपीने हा ई-मेल पाठवल्याची माहिती आहे…
या धमकीच्या ई-मेलनुसार, महापौर रितु तावडे (Ritu Tawde Bomb Email0) यांच्या कार्यालयावर आज दुपारी ३:११ वाजता, तर एका प्रसिद्ध शाळेवर दुपारी १:११ वाजता बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या जुहू येथील प्रसिद्ध ‘जलसा’ या बंगल्यावर आगामी २७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भीषण ग्रेनेड हल्ला करण्याची धमकीही या मेलमध्ये थेट देण्यात आली आहे… यासोबतच, आगामी २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित करण्यात आलेल्या गायक दिलजीत दोसांझच्या ‘आयकॉनिक इंडिया टूर’ संगीताच्या कॉन्सर्ट मानवी बॉम्बच्या साहाय्याने आत्मघाती हल्ला घडवून आणला जाईल, असा धक्कादायक उल्लेखही या ई-मेलमध्ये करण्यात आलाय… दिलजीत दोसांझच्या या कार्यक्रमाला हजारो तरुण चाहत्यांची गर्दी होणार असल्याने पोलिस सतर्क झाले आहेत…
हेही वाचा : सलमान खानने बिश्नोई गँगची माफी मागावी? सदावर्तेंनी गँगवर काय म्हटलं?
1984 च्या शीखविरोधी हिंसाचाराचा ई-मेलमध्ये संदर्भ
धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीने या मेलमध्ये प्रामुख्याने १९८४ मधील शिख दंगलीचा आणि शिख समुदायावर झालेल्या अन्यायाचा संदर्भ दिला आहे. हा थेट प्रतिशोध म्हणजेच बदला असल्याचे सांगत खलिस्तान समर्थक घोषणांचा वापर या मेलमध्ये करण्यात आला आहे. लहान मुलांच्या शाळांनाही टार्गेट करण्याची धमकी दिल्याने मुंबईतील पालक आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…पण 1984 मधील घटनेबाबत आता का धमकी देण्यात आली? असा प्रश्न निर्माण झाला…शिख धर्माचाचे असणारे दिलजीत दोसांझ यांनाही धमकी का देण्यात आली आहे?
तर या संपूर्ण वादाचे मूळ अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलेले असल्याची चर्चा आहे… काही काळापूर्वी दिलजीत दोसांझ हे छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात सहभागी झाले होते, जिथे त्यांनी आदरयुक्त भावना व्यक्त करत अमिताभ बच्चन यांच्या पाया पडले होते. खलिस्तान समर्थक आणि जहाल विचारसरणीच्या काही कट्टरपंथीय संघटनांच्या मते, १९८४ च्या शिख दंगलीच्या वेळी अमिताभ बच्चन यांची भूमिका शिखविरोधी होती… त्यामुळे अशा व्यक्तीचा आदर करणे म्हणजे १९८४ च्या पीडितांचा अपमान आहे, असा आरोप या कट्टरपंथ्यांनी दिलजीतवर केलाय…
दुसरे कारण म्हणजे खलिस्तानी विचारसरणीला पाठिंबा न देणे…दिलजीत दोसांझ हे केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर शिख संस्कृती आणि अस्मितेचे प्रतिनिधित्व करतात… मात्र, त्यांनी नेहमीच भारताची अखंडता आणि शांततेचे समर्थन केले असून खलिस्तानसारख्या फुटीरतावादी किंवा हिंसक चळवळींपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवले आहे… कट्टरपंथी संघटनांना असे वाटते की, एवढा मोठा शिख चेहरा असूनही दिलजीत त्यांच्या राजकीय किंवा फुटीरतावादी अजेंड्याला पाठिंबा देत नाही, म्हणूनच त्यांना ‘देशद्रोही’ किंवा ‘अँटी-शिख’ ठरवून लक्ष्य केले जात असल्याची चर्चा आहे….
हेही वाचा : Jio IPO 5 पट सबस्क्राइब! गुंतवणूकदारांना किती हजारांचा परतावा मिळणार?
धमकीमागील व्यक्ती कोण?
दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्या ‘दिल-लुमिनाटी’ आणि ‘आयकॉनिक इंडिया टूर’ या कॉन्सर्ट्सना सध्या भारतात आणि जगभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे… त्यांचे कार्यक्रम हाऊसफुल्ल होत असून लाखो तरुण त्यात सहभागी होत आहेत… अशा अत्यंत लोकप्रिय आणि चर्चेत असलेल्या कलाकाराच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्याची धमकी दिल्यास जागतिक स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळेल, हा या कट्टरपंथी संघटनांचा मुख्य हेतू असतो, असं म्हटलं जात आहे….
हा धमकीचा ई-मेल प्राप्त होताच मुंबई पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार ‘बॉम्ब शोधक आणि नाशक पथक’ आणि श्वान पथकाने तातडीने महापौर कार्यालय, अमिताभ बच्चन (Ritu Tawde Bomb Email) यांचा बंगला आणि संशयास्पद शाळांच्या परिसरात कसून तपासणी सुरू केली… सुदैवाने, प्राथमिक तपासणीत अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आलेली नाहीत, ज्यामुळे प्रशासनाने तूर्तास सुटकेचा श्वास घेतला आहे… सुरक्षेचा उपाय म्हणून महापौर कार्यालय आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गस्त वाढवण्यात आली आहे…









