बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर येताच मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. मुंडेंनी राजीनामा देऊन काही महिने झाले तरीही त्यांनी मलबार हिल येथील सातपुडा हा सरकारी बंगला सोडला नाही त्यामुळे त्यांना तब्बल 42 लाखाचा दंड ठोठावला आहे. तर दुसरीकडे मंत्री भुजबळ या बंगल्यात गृहप्रवेश करण्यासाठी प्रतीक्षेत आहे.