बंगळूरुमध्ये 39 वर्षीय विजय कुमार याची हत्या झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आशा आणि तिचा प्रियकर धनंजय यांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, विजय आणि धनंजय बालमित्र होते. मात्र, धनंजयचे विजयच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध जुळले. याचा सुगावा लागल्यानंतर विजयने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आशा आणि धनंजय यांनी मिळून विजयच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. हत्येनंतर धनंजय फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत