प्रवाशांसाठी खुशखबर! अखेर नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस १० ऑगस्ट रोजी धावणार असल्याची अधिकृत घोषणा मध्य रेल्वेचे CPRO यांनी केली आहे. ही बहुप्रतीक्षित सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजांकित केली जाणार आहे. नागपूर ते पुणे प्रवास आता अधिक जलद, आरामदायक आणि आधुनिक होणार आहे. वंदे भारतमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून व्यवसायिक व विद्यार्थी वर्गासाठी ही ट्रेन अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तीन नव्या वंदे भारत ट्रेनपैकी ही एक असून, महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सेवेमुळे नागपूर-पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास नव्या युगात प्रवेश करणार आहे.
(trending )