नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने लेंडी नदीला पूर आला आणि सहा गावं जलमय झाली. यामध्ये रावणगाव व हसनाळ येथे मिळून तब्बल ८९ नागरिक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी NDRFच्या पथकाने बचावमोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील दुसरे मोठे येलदरी धरण तुडुंब भरले असून सर्व १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.