नाशिकच्या नांदूर नाका परिसरात दोन गटांतील वादातून चॉपरसह लाकडी-लोखंडी दांड्यांनी हल्ला झाला. यात राहुल धोत्रे गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आडगाव पोलिसांनी बाबा निमसे, पवन निमसे यांच्यासह 11 जणांवर खुनासह गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.