नवी मुंबईतील बेलापूरमध्ये हॉस्पिटल व्हावे म्हणून बेलापूर आमदार मंदा म्हात्रे प्रयत्न करत आहेत. मात्र, त्या जागेवर खेळाचे मैदान असावे म्हणून नवी मुंबईतील नागरिकांची मागणी आहे. काल त्याच जागे संदर्भात कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने जिल्हाधिकारी, महापालिकेला नोटीस काढली असून संबंधित जागा सीआरझेड मध्ये येत असल्याने 4 ऑगस्टला पाहणी करून निर्णय घेण्यास सांगितला आहे. आज त्याच संदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी वन मंत्री गणेश नाईक यांनीच अशी नोटीस काढायला लावली असल्याचा आरोप करत गणेश नाईक यांचे वय काढले. मंदा म्हात्रेंनी केलेल्या टीकेमुळे गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.