भाजपाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना एक व्हिडिओद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही पाकिस्तानमधून फोन आणि व्हॉट्सॲपद्वारे त्यांना अशा धमक्या आल्या होत्या, त्या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे त्यातच अलीकडेच Insta‑रीलद्वारे देखील अशीच धमकी मिळाल्याने नवनीत राणा यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्याची माहिती दिली असून सायबर सेल तपास करत आहे.