बीडजवळील बिंदुसरा प्रकल्पात स्टंटबाजी करणारा तरुण पाण्याच्या प्रचंड प्रवाहात काही अंतर वाहून गेला. सुदैवाने तो एका दगडाला अडकला आणि तत्परतेने इतर तरुणांनी मदत करत त्याचा जीव वाचवला. जोरदार पावसामुळे प्रकल्प ओसंडून वाहत असूनही येथे तरुणांची स्टंटबाजी सुरू आहे. या धोकादायक प्रकारांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.