रणथंभोर राष्ट्रीय उद्यानातील ZONE-6 मध्ये मोठी बेफिकिरी समोर आली आहे. सफारी दरम्यान कॅंटर बिघडल्यानंतर तब्बल २० पर्यटक, महिलांसह लहान मुले, अंधारात अडकले. मार्गदर्शक वाहन आणण्याच्या बहाण्याने जंगलातच सोडून पळाला. जवळपास दीड तास पर्यटक टॉर्च व मोबाईल लाईटच्या आधारावर भीतीत थांबले. शेवटी दुसरे वाहन पाठवून बचाव करण्यात आला. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी सुरू करून मार्गदर्शक मुकेश कुमार बैरवा व तीन कॅंटर चालकांना सफारीवर बंदी घातली. पर्यटकांच्या सुरक्षेला तडजोड मान्य नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले असून सफारी वाहनांच्या देखभालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत