‘लाडकी बहीण’ या योजनेनंतर आता नोकरदार महिलांच्या मुलांसाठी ‘पाळणा योजना’ लवकरच सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात 345 पाळणा केंद्र सुरु होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे त्यांनी दिली. नोकरदार महिलांच्या मुलांची जबाबदारी शासन उचलणार असून 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित देखभाल, पूर्वशालेय शिक्षणासोबत सकस आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण सुविधा असणार आहेत.