श्रावण महिना संपल्याने आज रविवारी मासे, चिकन व मटणाच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली. शनिवारी अनेकांनी मांसाहार टाळला होता, मात्र सुट्टीचा दिवस असल्याने आज सकाळपासूनच दुकाने गजबजली. मंगळवारी हरतालिका व बुधवारी गणेशोत्सव सुरू होत असल्याने पुढील काही दिवस पुन्हा मांसाहार टाळला जाणार आहे. दरम्यान चिकनचे भाव कमी झाले असून मटणाचे दर स्थिरच आहेत.