नागपूरमधील संविधान चौकात ओबीसी न्याय हक्कासाठी साखळी उपोषण सुरू आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी उपोषणाची सुरुवात केली. भाजप आमदार आणि ओबीसी नेते आशिष देशमुखही उपोषण स्थळी उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची पिवळी टोपी व दुपट्टा परिधान करत आशिष देशमुख म्हणाले, “जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा,” अशी घोषणा त्यांनी केली.